बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेत अतिक्रमण विभागातर्फे हातगाडी, स्टॉल, स्थीर गाडा किंवा बसून विक्री करणार्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईबाबत महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याशी चर्चा करण्यात आली. लवकरच पुढील दिशा ठरवून नगरपरिषदेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. नगरपरिषदेने या लोकांच्या विकासासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही.