प्रभाग 19 मधील रस्ते, स्ट्रीट लाईट काम मार्गी

बारामती(वार्ताहर): शेंडेवस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, अनुचंद्र हॉस्पिटल पाठीमागील रस्ता याबाबत स्थानिक नगरसेविका सौ.अनिता जगताप यांनी सतत पाठपुरावा करून मार्गी लावले. तर गुजर इस्टेट, हरिकृपानगर अंतर्गत रस्ते व जनहित प्रतिष्ठान शाळा समोरील रस्त्यांच्या कामाचा पाठपुरावा स्थानिक नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी मार्गी लावला.

यावेळी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, सौ.सविता जाधव, बांधकाम सभापती संतोष जगताप, निलेश मोरे, पराग गुजर, भाविन गुजर, अमोल वाघमारे, सिद्धार्थ सोनवणे, युवराज चव्हाण, अशोक राऊत, अशोक जगताप, सोमनाथ आटोळे, प्रमोद ठोंबरे, अरुण पाटोळे, सागर शीलवंत, विशाल गायकवाड इ. नागरीक उपस्थित होते.
या भागात अनेक वर्षापासून रस्ते करण्याची मागणी लक्षात घेता, रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. अंडरग्राउंड लाईट कनेक्शन, स्ट्रीट लाईटचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाले असून सर्वच भागात स्ट्रीट लाईटचे पोल बसवण्याचे काम थोड्या दिवसात सुरू करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!