बारामती(वार्ताहर): नवीन वर्षाच्या संध्येला नव्या उमेदेने आमराई विभागातील महिलांनी एकत्र येऊन उत्कर्षा महिला बचत गटाची स्थापना केली आहे. सदरचा गट आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सुद्धा भरीव असे काम करणार असल्याचे गटाच्या अध्यक्षा सौ.शमा रज्जाक शेख यांनी यावेळी सांगितले.
भविष्यात महिलांसाठी प्रेरणादायी बचत गट ठरणार असल्याचे गटाच्या सचिव सौ.स्मिता कैलास शिंदे यांनी सांगितले. खजिनदारपदी अश्र्विनी विक्रांत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. शासनाचे प्रतिनिधी नगरपरिषदेचे अली मुल्ला यांचे देखील मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी आरती भोसले, शोभा सोनवणे, पूजा मोरे, सांची रणधीर, मिनाक्षी शिंदे, शिला खंडाळे, रामेश्र्वरी मोरे, कोमल भोसले, तेजस्वी कदम, स्वाती खरात इ. महिला सभासद उपस्थित होत्या.