ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप

बारामती(वार्ताहर): भीमा-कोरेगाव शौर्य दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ऊस तोड कामगारांच्या मुलांना कोपीत जावून खाऊ वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या बारामती शहराध्यक्षा सौ.आरती शेंडगे(गव्हाळे) व पदाधिकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्याप्रमाणे राज्य सरकार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी तत्पर आहे त्याचाच एक भाग म्हणून फुल-ना फुलाची पाकळी देवून सामाजिक हित जोपासत खाऊचे वाटप करण्यात आले असल्याचे सौ.शेंडगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!