बारामती(वार्ताहर): रागिनी फाऊंडेशनच्या वतीने 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन रागिणी फाऊंडेशन च्या कार्यालयात करण्यात आले.
या निमित्त बोलत असताना ’साडी बँक हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या माध्यमातून गरजू महिलांना साडी मिळण्यास मदत होईल, एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या उपक्रमाकडे पाहिल्यास निश्चितच या उपक्रमाचा फायदा महिलांना होऊ शकेल’ अशा प्रतिक्रिया सौ वनिता बनकर (तालुका अध्यक्ष, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस व संस्थापिका सावित्रीबाई फुले महिला मंडळ) यांनी दिल्या.
रागिनी फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त ’साडी बँक’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाच्या माध्यमातून वापरलेल्या परंतु न फाटलेल्या, साड्यांचे संकलन करून, ह्या साड्या गरजू महिलांना पर्यंत पोहोचवण्याचे काम रागिनी फाऊंडेशन च्या माध्यमातून केले जाणार आहे. या उपक्रमाचे जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन रागिणी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता ढवाण यांनी सर्व महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन व महिला शिक्षण दिन यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने महिला शिक्षण दिन साजरा करण्यासाठी महिलांनी योगदान द्यावे असे तु.च. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.वैशाली माळी यांनी सुचित केले. सौ.संगीता गिरमे यांनी सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवन प्रवास तर सौ.मंगल बोरावके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ओव्यांचे सादरीकरण केले.
सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सौ.कमल हिंगणे, सौ. सारिका ढोले, ढवाणवस्ती केंद्रप्रमुख रमेश गिरमे, सौ.वैशाली जाधव, सौ.सुनंदा मुळे, जंगम, सौ.सुचिता जाधव, सौ.मनीषा जोरी, सौ.हर्षदा जगताप, सौ दीपिका बारवकर, फैयाज पठाण, वाल्मीक बरकडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार विठ्ठल जोरी यांनी केले तर हा उपक्रम पूजा व प्रतिभा बोराटे यांचे सहकार्य लाभले.