मॉं तुझे सलाम या देशभक्तीपर चित्रपटातील डायलॉग ङ्कदूध मॉंगो तो खीर देंगे, लेकीन कश्मीर मॉंगोगे तो चीर देंगेङ्ख या प्रकारे बारामती शहर पोलीस स्टेशनला नव्याने पदभार स्विकारलेले नामदेव शिंदे यांनी आपल्या कामातून गुन्हेगार व गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना दाखवून दिले आहे. तुम्ही गुन्हेगारी, अवैध धंदे सोडून चांगले काम केले तर त्याची प्रशंसा व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देवू, मात्र गुन्हेगारी व अवैध धंदे सर्रास सुरू ठेवले तर त्यास खाकी दाखवत गजाआड केले जाईल.
नविन वर्षात संकल्प करूया, दारू नको..दूध पिऊया या अभिनव उपक्रमास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खाकी वर्दी चढविली की पोलिसाने नाती-गोती आणि वैयक्तिक मते विसरून निःपक्षपाती कामे केली पाहिजे अशी रास्त आपेक्षा पोलिसांकडून नागरीकांची असते. वर्दी एका नव्या माणसाला जन्म देते. तो सर्वांचा रक्षणकर्ता असतो. त्याच्यासमोर येणार्या अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे आणि अन्याय करणार्याला तुरुंगात डांबणे, असे काम पोलिसाच्या हातून व्हावे, अशी साधारणपणे या व्यवस्थेची रचना आहे. मात्र, वर्दी चढविली, म्हणजे त्याच्यातील माणूस आणि माणुसकी संपली असे नाही. उलट, ती अधिक संवेदनशील होत असते. असाच या वर्दीला न्याय देणारे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशनला लाभलेले आहेत. नागरीकांची मने जाणणारे पोलीस निरीक्षक आहेत.
ज्यावेळी पोलीस राजकारणी मंडळींच्या आहारी जातात त्यावेळी सर्वसामान्य जनता पडद्यामागे जाते. अन्याय ग्रस्ताला न्याय न मिळता त्याच्यावर अन्याय होत असतो. राजकीय मंडळी पोलीसांचा आपल्या सोयीनुसार त्यांचा वापर करून घेतात. राजकारण्यांना सत्तेसाठी पोलिस यंत्रणेचा वापर हवा असतो. तर पोलिसांना चांगल्या ठिकाणच्या बदल्या, अर्थात आर्थिक लाभासाठी राजकीय लोकांचा वापर हवा असतो. या गडबडीत सामान्यांवर अन्याय होतो आहे, याचा दोघांनाही विसर पडला. यात सर्वांत जास्त नुकसान होते ते म्हणजे पोलीसांचेच! राजकारण्यांना मदत करूनही जेव्हा गरज पडेल, तेव्हा राजकारणी पोलिसांनाच लाथाळतात, शिव्याशाप देतात, तर दुसर्या बाजूला सामान्य जनतेचाही रोष पोलिसांवरच असतो. याचा अर्थ, सर्व पोलिस एक आहेत, असाही नाही. या सर्व बाबींच्या उलट नामदेव शिंदे आहेत. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी निपक्षपाती पणे काम केले आहे. दिल्या त्या ठिकाणी उत्तम सेवा बजावली आहे.
जुने पोलीस निवृत्त झाले नव्या दमाचे पदवीधर पोलीस मिळाले तरी सुद्धा पोलीस यंत्रणात सुधारणा झाल्याचे दिसत नाही. माजी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या मतानुसार, केवळ माणूस बदलून काम होणार नाही, यंत्रणाच बदलावी लागेल, कामाची पद्धतीच सुधारणा करावी लागेल. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत जुन्या यंत्रणेतही कितीही नवी माणसे आली, तरीही ती जुन्याच पद्धतीने वागतील. सध्याच्या पोलिस दलाची अवस्था पाहिल्यास खोपडे यांचे हे मत पटणारे आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचेसारखे उच्च विचार व कामात राम पाहणारे, शासनाचे हीत पाहणारे अधिकारी सर्व खात्यास मिळाले तर भ्रष्टाचार मुक्त भारत होण्यास वेळ लागणार नाही. महत्वाचे पोलीस स्टेशन मिळविण्यासाठी पोलीस खात्यात जी रस्सी खेच सुरू असते त्यातीलच एक बारामती शहर पोलीस स्टेशन आहे. नामदेव शिंदे यांनी या पोलीस स्टेशनला याठिकाणी कोणत्याही कामास पैसे घेतले जात नाही असा फलकच लिहिलेला आहे. यापुर्वी पोलीस स्टेशन म्हटलं की, ज्याच्याकडे पैसे त्यालाच न्याय मिळत असे, मात्र, नामदेव शिंदे आलेपासून अन्यायग्रस्ताला न्यायच मिळत आहे. यामुळे अवैध धंदे करणारे, आरोपी, अट्टल गुन्हेगारांनी धसका घेतला आहे. तर काहींनी बारामतीसुद्धा सोडलेली आहे.