बारामती(वार्ताहर): प्रभाग क्रमांक 19 मधील शेंडेवस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण व अनुचंद्र हॉस्पिटल पाठीमागील रस्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविका सौ.अनिता दिनेश जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सदरचे काम मार्गी लागले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव, उपगटनेत्या सौ.सविता जाधव, बांधकाम सभापती संतोष जगताप, नगरसेवक राजेंद्र बनकर, नवनाथ बल्लाळ, सत्यव्रत काळे, नगरसेविका सौ.मयुरी शिंदे, अभिजीत चव्हाण, सूरज शिंदे, आलताफ सय्यद, गणेश कदम, शंकर नाळे, सलीम शेख, तानाजी पवार, अमन पाटोळे इ.मान्यवर उपस्थित होते.