बारामती(वार्ताहर): खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून स्थानिक नगरसेवक सत्यव्रत (सोनू) काळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वच्छता अभियान घेण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ नगरीच्या नगराध्यक्ष सौ.पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले.
यावेळी बारामती नगरपरिषद उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, आलताफ सय्यद, सिद्धनाथ भोकरे, बन्सीलाल मुथा इ. मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शाखा काळेनगर तसेच स्थानिक कार्यकर्ते रफिक शेख, अमीर बागवान, शफिक इनामदार, दीपक शिंदे, सोनू शिंदे, पिंटू मुसळे, नागेश कासार, विष्णू पवार व स्थानिक नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. काळेनगर, बुरुडगल्ली, चिमणशहामळा या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.