बारामती(वार्ताहर): खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर युवती कॉंग्रेसच्या वतीने तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला.
’सन्मान माणुसकीचा’ या उपक्रमाअंतर्गत शहराध्यक्षा सौ.आरती शेंडगे (गव्हाळे) यांनी प्रशस्तीपत्र देवून साक्षी खत्री, सायली शेख, झोया बगाडे, लक्ष्मी कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पूर्वग्रहदूषित गैरसमजांना तृतीयपंथी लोक सामना करत आहेत. सामाजिक, राजकीय व आर्थिक आव्हानांना तोंड देत आहेत. समाजात माणूस म्हणून नवीन ओळख मिळावी या हेतूने खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एलजीबीटी या सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत प्रश्र्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, पुणे जिल्हा युवती पुजा बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर युवती अध्यक्षा सौ.आरती शेंडगे यांनी यांना प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र, देवुन सत्कार करण्यात आला.