वतन की लकीर (ऑनलाईन): गेल्या काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या कामी होत असल्याने आता एक आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासात फक्त 16 हजार पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. रूग्णांचा आकडा कमी झाला व ऍक्टिव्ह रूग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झालेली आहे. गेल्या काही तासा पुर्वी 29 हजार रूग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.
मुंबई, पुण्यात नव्या स्ट्रेनचे रूग्ण आढळले आहेत. नवा स्ट्रेन महाराष्ट्रात आला आहे. ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रूग्णामधील मुंबईतील 5 आहेत. पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. या सर्वांचे विलगीकरणात असून त्यांचे कोणा-कोणाशी संपर्क आला त्याबाबत ट्रेस करण्याचे सुरू आहे.
बारामतीत दि. 04 जानेवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 13 तर ग्रामीण भागातून 10 रुग्ण असे मिळून 23 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 123 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 15 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 01 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. 38 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 5 हजार 877 रुग्ण असून, बरे झालेले 5 हजार 541 आहे तर मृत्यू झालेले एकशे अडोतीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 09 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी सतत मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेसिंग, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे.