बारामती(वार्ताहर): पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने बारामती बस स्थानकातील चालक, वाहक, कर्मचार्यांना मास्क वाटप व प्रवाशांसाठी सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले.
आगार प्रमुख अमोल गोंजारी या सर्व वस्तु सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष हणमंतराव पाटील, उपाध्यक्ष महावीर शहा, सचिव विजय इंगळे, प्रतिक दोशी, स्वप्निल मुथा, मल्लिकार्जुन हिरेमठ, दत्तात्रय बोराडे, अतुल फरसोले,सौ.सुप्रिया बर्गे इ. मान्यवर उपस्थित होते.