10 जानेवारीला पोलीसांसाठी आरोग्य शिबीर!

बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रात्रीचा दिवस करून  नागरीकांची सेवा करणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांची 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

केंेद्रीय पत्रकार संघ, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना, दलित पँथर संघटना व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे वस्ताद अस्लम शेख, अमित बगाडे, बाळासाहेब सरतापे व गौरव अहिवळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या शिबीरामध्ये शुगर, बीपीची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरास मेडिकोज गिल्ड बारामती यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!