बारामती(वार्ताहर): येथील सुप्रसिद्ध हॉटेल ग्रँडच्या फॅमिली सेलिब्रेशन हॉलचा उद्घाटन समारंभ सुभद्रादेवी अर्जुनराव काळे, सिनेअभिनेत्री शिवानी बावरकर उर्फ शीतली यांच्या शु़भहस्ते झाला.
यावेळी शिवानी बावकर यांनी लागिरं झालं… या मालिकेत केलेली भूमिका त्या मालिकेतील काही डायलॉग सांगितल्यावर उपस्थित महिला व पुरुषांनी त्यास दाद दिली.
कमी कालावधीत हॉटेल ग्रँडने नावलौकीक कमाविला आहे. बारामतीकरांच्या चोखंदळ ग्राहकांची मने जिंकली आहे. यावेळी मेंबर थाळी, सी फूड थाळी, चिकन रान, बांबू बिर्याणी या थाळीचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हॉटेलचे मालक नगरसेवक सत्यव्रत उर्फ सोनु काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. यावेळी बहुसंख्य नागरीक व सोनु काळे मित्र परिवार उपस्थित होते.