बारामती(वार्ताहर): ग्राहक संरक्षण कायदा,2019 हा जुलै, 2020 पासून देशामध्ये लागू झाला असून या नवीन कायद्यामध्ये व्यावसायिकाने/व्यापार्याने/दुकानदाराने ग्राहकाला सदोष/खराब वस्तू/उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत ग्राहक जिल्हा आयोगात तक्रार दाखल करून सर्वांनाच न्याय मिळवून देऊ शकतो. वस्तू खरेदीची पावती/बिल घेणे आवश्यक आहे. या कायद्यामध्ये व्यवसायिकाने ग्राहकाला दोषयुक्त वस्तू/ उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत ग्राहक आयोगात दाद मागू शकतो. सदर वस्तू सदोष/खराब/दोषयुक्त आढळल्यास आयोग वस्तू नवीन देण्याचे किंवा नुकसानभरपाई देण्याचे आदेश देईल. वस्तूच्या उत्पादनात दोष असेल आणि एकाच प्रकारच्या अनेक तक्रारी असतील तर आयोग सदर वस्तू विक्री केलेल्या सर्व ग्राहकांना वस्तू बदलून देण्याचे आदेश देईल. ग्राहकाला जिल्हा आयोगात 5 लाखापर्यंत तक्रारीसाठी/ दाव्यासाठी शुल्क नाही, मोफत दाखल करण्यात येतात. जिल्हा आयोगाला 90 दिवसात निकाल देने कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्यास/ वस्तू खराब लागल्यास जिल्हा आयोगात तक्रार करा. याबाबत इतरांनाही न्याय मिळवून द्या असे आवाहन राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील (मो.9545594959) यांनी केले.