कोविड-19 लसीकरणासाठी शासकीय व खाजगी कर्मचारी यांनी तात्काळ पोर्टलवर नोंदणी करावी – प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

बारामती(उमाका): बारामती तालुका टास्क फोर्स समितीची बैठक नुकतीच टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली.

यावेळी टास्क फोर्स समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. सदानंद काळे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, मिथुनकुमार नागमवाड , आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल जगताप आदी उपस्थित होते.

कोविड लसीकरणासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. यामध्ये सुरवातीच्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय आरोग्य कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, सफाई कर्मचारी यांना कोविड ची लस देण्यात येणार आहे. त्याकरीता या सर्वांनी Covin Portal वर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगून ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यांनी तात्काळ 30 डिसेंबर 2020 पर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती बारामती यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी  केले.

टास्क फोर्स समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यावेळी कोविड लसीकरण नियोजन बाबत माहिती देताना म्हणाले की,  तालुक्यातील शासकीय आरोग्य कमचारी यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे. परंतु काही खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, कर्मचारी यांची नोंदणी पोर्टलवर झालेली नाही. पोर्टलवर नोंदणी असल्याशिवाय लस दिली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!