बारामती(वार्ताहर): मुस्लिम बँकेचे चेअरमन, शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार यांचा वाढदिवस सभासद, खातेदार व हितचिंतकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ व केक कापुन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी इनामदार साहेबांना सर्व बारामतीतील सभासदांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व दिर्घआयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, धमेंद्र गुलाबराव पाटील, वसीम कुरेशी सुभान कुरेशी, परवेज सय्यद, अफरोज मुजावर, निसार शेख, असिफ झारी, सलीम तांबोळी, अखलाज सय्यद, इम्रान शेख, अजिम शेख, हाजी फिरोज कुरेशी, व बारामतीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इनामदार साहेब यांनी बारामतीहुन आलेल्या सर्व सभासदांचे व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले व भविष्यामध्ये बारामतीकर अशी खंबीर साथ देवुन माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा व्यक्त केली.
तसेच यावेळी दि मुस्लिम को.ऑफ लि.पुणे व्हाईस चेअरमन पदी श्री.अलीरजा इनामदार यांची निवड झाल्या बदद्ल त्यांचे सुध्दा बारामतीतील सर्व सभासदांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांना सुध्दा पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.