पद असो किंवा नसो, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी तळमळीने कार्य करणारे आलताफ सय्यद
बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुक्यातील उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणार्या शैक्षणिक कर्ज योजनेचा कॅम्प बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद व मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या वतीने घेण्यात आला होता.
या योजनेत बारामती शहर व तालुक्यातील 25 विद्यार्थ्यांचे कर्जप्रस्ताव महामंडळाकडून मंजूर करण्यात आले. त्या मंजूरी पत्राचे वाटप आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आलताफ सय्यद यांनी महामंडळाच्या पुणे, मुंबई कार्यालयात सतत पाठपुरावा करून हे कर्जप्रस्ताव मंजूर करून आणले. ना.अजित पवार यांनी सुद्धा महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांना योग्य ते आदेश देवून लवकरात लवकर कर्ज मंजूरी करण्याची सूचना केली होती. अल्पसंख्यांक समाजातील मुस्लीम, जैन, ख्रिश्र्चन, नवबौद्ध, शीख व पारसी समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी आलताफ सय्यद यांच्याकडे संपर्क साधावा.
पद असो किंवा नसो, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी तळमळीने कार्य करणारे आलताफ सय्यद आहेत. उच्च शिक्षण घेणार्या मुलांसाठी त्यांची तळमळ या कार्यातून दिसत आहे.