बारामती(वार्ताहर): स्व. विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठान, निलेश भाऊ मित्र मंडळ व पलंगे पेट्रोलियम यांच्या वतीने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 500 ब्लॅकेट वाटप करून गोर-गरीबांना मायेची ऊब देण्याचे खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे.
पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर इ. ठिकाणी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठान, निलेशभाऊ मित्र मंडळ व पलंगे पेट्रोलियम या संस्थांकडून विविध सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात.

बोचर्या थंडीतल्या या जीवघेण्या काळरात्री… या थंडीने गारठून टाकले. आधीच कोरोना त्यामध्ये बेरोजगारी त्यामुळे कित्येकांनी तिर्थक्षेत्राचा आसरा धरला आहे. कुठे अंगाचे मुटकूळ करुन, तर कुठे स्वतःला पुठ्ठ्याच्या खोक्यात लपवून, थंडीपासून वाचण्याची कसरत करणार्याचे दृश्य प्रतिष्ठानने टिपले आणि त्यांच्यासाठी धावून गेले.
यावेळी गणेश पलंगे, शैलेश पलंगे, गितेश पलंगे, उमेश पलंगे, संजय किर्वे यांनी याठिकाणी ब्लँकेटचे वाटप करून गोर-गरीब, दु:खी पिडीतांना मायेची ऊब देण्याचे काम केले आहे. समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब देण्याचा एक छोटासा उपक्रम केला असल्याचे निलेश पलंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.