बारामती(वार्ताहर): राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त ज्येष्ठ नामांकित पैलवान व वस्ताद यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवकाध्यक्ष अमर धुमाळ, नगरसेवक पै.सत्यव्रत उर्फ सानु काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पै.संजय जगदाळे यांची सहाय्यक पो.उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेबद्दल व पोलीस सन्मान चिन्ह पदक व 1 हजार गुन्ह्यांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पै.किसन जाधव हे बारामती ते शिवनेरी किल्ला 390 कि.मी. अंतर सायकलवर पार केले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उघोगपती पै. उत्तमदादा फरतडे, महिला कुस्तीपटू पै.अनिता गव्हाणे, पै. पोपट गावडे, पै.महादेव गावडे, पै.एकनाथ पलंगे, पै.भारत ढोले, पै.प्रताप गालिंदे, पै.सुभाष जांभळकर, पै.चव्हाणतात्या,पै. दशरथ निकम, पै.विजय जगताप, पै.सादिक आत्तार, पै.शाम खडके, पै.शरद इंगुले, पै.गायकवाड (सर), पै.सुधाकर माने, पै.किशोर देवळे, पै.बाळासाहेब बुलबुले, शब्बीर शेख यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रेसलिंग वॉरियस फेडरेशन बारामतीचे पै.सागर माने, पै.धनंजय गावडे, पै.गणेश जाधव, पै.अनिकेत पवार, पै.गौरव गालिंदे, पै.गितेश पलंगे, पै.संदिप शिदे, पै.सोकटे यांनी केले होते.