अजित ड्रायक्लिनर्सचा प्रामाणिकपणा,इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यातील पैसे परत

बारामती: गेल्या तेरा वर्षापासून बारामतीत अजित ड्रायक्लिनर्सच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करीत आलेले अजित लक्ष्मण पवार यांच्या कसब्यातील ड्रायक्लिनर्समध्ये इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये 7 हजार रूपये खिश्यात आढळून आले. ड्रायक्लिनर्सचे मालक अजित पवार यांनी कपड्यांचे मालक संजय सातव यांना फोनद्वारे पैश्याबाबत कल्पना दिली. या वार्तामुळे संजय सातव व त्यांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी तातडीने अजित ड्रायक्लिनर्स गाठले आणि अजित ड्रायक्लिनर्सचे सर्व स्टाफ व अजित पवार यांचे मनापासून आभार मानले. सर्वत्र अजित ड्रायक्लिनर्सचे मालक व कामगारांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!