बारामती: वडगांव निंबाळकर पोलीसांनी अटक केलेला अक्षय विलास खोमणे (वय-24, रा.कोर्हाळे) याने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावुन चोरी केल्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता त्याने माझे साथीदार चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय-32, सध्या रा.निरा ता.पुरंदर जि पुणे) व राहुल पांडुरंग तांबे (वय-28, रा.जेऊर ता पुरंदर जि.पुणे) असे आम्ही तीघांनी मिळुन बारामती शहरात एकुण तीन वेगवेगळया ठिकाणी महीलांचा पाठलाग करून त्यांचेकडे पत्ता विचारनेचा बहाना करून त्याचे गळयातील सोन्याचे गंठण जबरीने हिसकावुन चोरी करून चोरून नेले असल्याची कबुली दिली.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनने आरोपी अक्षय खोमणे यास गु.र.नं 498/2020 भा.द.वी कलम 392,34 या गुन्हयात अटक केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.396/2020 भा.द.वि.कलम 392,34 प्रमाणे दाखल गुन्हयात वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस कस्टडीतील आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याचेकडुन तीन वेगवेगळया गुन्हयातील एकुण 3 लाख रूपये किंमतीचे तीन वेगवेगळी सोन्याचे गंठणे एकुन सहा तोळे वजनाचे आरोपी कडून हस्तगत करून बारामती शहर पोलीस ठाण्यातील 1) 384/2020 भा.द.वि.कलम 392,34 2) 396/2020 भा.द.वि.कलम 392,34 3) 566/2020/2020 भा.द.वि.कलम 392,34 असे जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत असून अटक आरोपी याने पुणे जिल्हात वेगवेगळया पोलीस ठाणेत दरोडयाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सचिन शिंदे, सहा.पो.उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक रूपेश साळुखे, पो.कॉ.सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडु कोठे, योगेश कुलकर्णी,अजित राऊत, तुषार चव्हाण, अकूबर शेख, अशोक शिंदे यांनी केली.