बारामती (वार्ताहर): शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसविण्याच्या आवाहनाला बारामती शहरातील पान असोसिएशनने समाजाचं आपण काही तरी देणं लागतो या हेतूने 11 हजार रूपयांचा निधी दिला. यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निधी सुपूर्द करताना बारामती शहर पान असोसिएशनचे अध्यक्ष सलीम तांबोळी, उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, सचिव जहॉंगीर तांबोळी, कार्याध्यक्ष रफिक शेख, सहसचिव आक्रम शेख, सदस्य विकास सोनवणे हे पदाधिकारी उपस्थित होते.