कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांना मारहाण करणार्‍यांवर कठोर शासन करण्याची पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी!

बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस यंत्रणेने केलेले काम पाहुन सर्वस्तरातून कौतुक होत असताना तसेच प्रत्येकाच्या मनात पोलीसांना एक सॅल्यूट मारलाच पाहिजे असे असताना बेकायदेशीर वाळू उपसा माफियांनी कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांवर हात उचलून मारहाण करणार्‍यांवर कठोर शासन करण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे.

सदरचे निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व बारामती शहर पोलीस स्टेशन इ. देण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यात अवैध वाळु वाहतुक करणार्‍या वाहनांची चौकशी करीत असताना वाळू माफियांकडून पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण होत असेल तर कायदा हातात घेतल्यासारखे आहे. या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, यांच्यावर कठोर शासन करण्यासाठी व पुन्हा असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनने ठिकठिकाणी निवेदन सादर केलेले आहे.

पोलीस बॉईजचे संस्थापक अध्यक्ष रवि ना.वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास सुसर, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहित ओंबासे, पुणे कार्याध्यक्ष आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहराध्यक्ष संजय दराडे यांनी निवेदन दिले आहे. या निवदेनात पुणे जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू माफियांनी हाहाकार माजवलेला आहे. बळ व पैशाच्या जीवावर कायद्याला न जुमानता, न घाबरता वाळू उपसा सुरू आहे. कारवाई झाल्यावर पोलीसांना बदनाम व अपमान करीत असल्याचे म्हटले आहे.

निवेदन देते वेळी शहराध्यक्ष संजय दराडे, शुभम भंडारे, ओंकार दराडे, साजन अडसुळ, अमोल बिनवडे, करण नवले, अनिकेत वणवे, ऍड.मेघराज नालंदे, ऍड.ओंकार इंगुले इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!