बारामती(वार्ताहर): तालुका ए.आर. फाऊंडेशन व जी.एस. साम्राज्य बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित दक्ष पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते शासकीय महिला रुग्णालय येथे सर्व रुग्णांना फळे व मास्क वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र ए.आर. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामभैय्या गायकवाड यांच्या आशिवार्दामुळे व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ए.आर. फाऊंडेशनचे राहुल पवार,योगेश शेवाळे, किशोर पवार, निखिल लोणारी, प्रतिक लालबिगे कार्यकर्ते व जी.एस. साम्राज्यचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र(मेंबर) धोत्रे सह रणजित नाझीरकर, मनोज लाळगे, श्रीकांत नाझीरकर, गणेश थोरात, नीता खरात, अनिता पंजाबी, अश्विनी सपकाळ, शीतल पवार, श्वेता पवार, गौरव जाधव, प्रेम शिंदे, कृष्णा शिंदे या सर्वांनी मोलाचे सहकार्य लाभले.