बारामती तालुका शहर व ग्रामीण भागातील रिपब्लिकन युवा मोर्चा व त्रस्त ग्राहकांच्या आंदोलनाला यश
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका शहर व ग्रामीण भागातील रिपब्लिकन युवा मोर्चा, बहुजन संघटनांचे प्रतिनिधी व त्रस्त ग्राहकांच्या वतीने वीज वितरण कंपनी बारामती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरसकट विजबिले पुर्णपणे माफ करणे कामी जनआक्रोश मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.
अन्न,वस्त्र व निवारा या नागरीकांच्या मुलभूत गरजांमध्ये वीज ही महत्वाची गरज होऊन बसली आहे. लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे मुबलक आलेले बिजबिल भरण्यास पैसा नाही. वीजबिल माफ होण्यासाठी व वाढीव बिलांची चौकशी होणेकामी हे आंदोलन छेडण्यात आले होते.
यावेळी बारामतीमधील रिपब्लिकन युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय लोंढे, पुर्व विभाग पुणे अध्यक्ष अनिल मोरे, बारामती तालुका उपाध्यक्ष आनंद काकडे, सामाजिक कार्यकर्ते संदिप बनसोडे, शेरसुहास मित्र मंडळ व मानव एकता युवक संघटना प्रमुख भारतदादा अहिवळे, शुभम अहिवळे, मार्केट कमिटीचे विलास पोमणे, कॉंग्रेस शहर युवक अध्यक्ष योगेश महाडीक, आनंद माने तसेच बारामती मधील बहुसंख्य विजबिल त्रस्त महिला पुरुष धारक उपस्थित होते.
यावेळी शासन प्रशासन विरोधात तीव्र घोषणा बाजी करीत महामानवांच्या घोषणांची घोषणा बाजी करीत विद्युत विजबिल सरसकट माफ करा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहा.कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, धनंजय गावडे यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्या समजून घेऊन सर्व मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे लेखी आश्वासन दिले. लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विजबिलांची फेरतपासणी, सर्व्हेक्षण व तपासणी मोहिम राबवून जनतेसाठी हितार्थ निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले.
कोरोना राष्ट्रीय आपत्तीत देशातील सर्वोत्परी घटक याचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते यामध्ये प्रामुख्याने लघुउद्योजक छोटे मोठे व्यावसायिक यांचे व्यावसाय डबघाईला आले तर असंख्य लोकं ही रोजगारा पासून वंचित झाले आहेत.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे त्रिशंकु सरकार असून जनहितासाठी ते निर्णायक काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्तीत लोकांचे जगणे जिकरीचे झाले आहे सरकारने मध्यम मार्ग म्हणून गेल्या काही महिन्यांपुर्वी पन्नास टक्के विजबिल माफी बाबत अहवाल तयार केला होता परंतु राजकीय महाविकास आघाडीत तारतम्य नसल्यामुळे सदर सरसकट विजबिल माफी चा प्रस्ताव पुढे रेंगाळला.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे सर्वत्र कौतुक…
लाईटबिल जास्त येत आहे, रिडींग घेतले जात नाही इ. वीज ग्राहकांच्या तक्रारी येत असताना कोणीही यांच्याबाजुने बोलत, भांडत नव्हते ग्राहकही न बोलता आलेले बिल भरीत होते. मात्र त्रस्त वीज ग्राहकांसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाने आंदोलन करून घेतलेली भूमिकेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे सर्वत्र मोर्चाचे कौतुक होत आहे.