बारामती(वार्ताहर): एखाद्या कार्यक्रमाचा फोटो फोटोग्राफरने काढल्यानंतर वृत्तपत्रात त्या फोटो खाली फोटोग्राफरचे नाव टाकले जाते. मात्र, आज उत्कृष्ठ फोटोग्राफर हितेश जाधव यांचे आकस्मिक दु:खद निधन झाले आणि आज त्याच्या फोटो खाली त्याचे नाव टाकण्याची परिस्थिती येत असेल तर ही खूप मोठी दु:खद घटना आहे.
अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे सदस्य आणि उत्कृष्ठ फोटोग्राफर हितेश बाळासाहेब जाधव यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ, क्षत्रिय तरूण मंडळ व क्षत्रियकुलवंत टकारी समाज, बारामती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजकारणाला नुकतीच सुरूवात केली होती. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाने हितेशची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती.
सामाजिक कार्याचा किंवा मंडळाचा फोटो मेलवर टाकला आहे याबाबत तो नक्की फोन करून सांगत असे. त्याच्या जाण्याने श्रावणगल्ली,कोष्टीगल्ली, गोकुळवाडी, तांदुळवाडी वेस इ. ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात होती.
हितेशच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई-वडिल, तीन भाऊ असा परिवार आहे. हितेशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ईश्र्वर त्यांना देवो हीच प्रार्थना.