माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी प्रवेश सुविधा उपलब्ध

माळेगाव: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे.चालू शैक्षणिक वर्षामध्ये इंजिनीअरिंग ऍडमिशनसाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेल द्वारे या वर्षीच्या पदवी अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) दिनांक 9 डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी दिनांक 9 ते 22 डिसेंबर 2020 व थेट द्वितीय वर्षासाठी दिनांक 9 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने प्रवेश नोंदणी प्रक्रिया करावयाची आहे. सदर ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिनार्‍या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्री प्रमोद शिंदे यांनी केले. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व प्रक्रियेविषयी माहिती मिळविण्यासाठी तसेच काही शंका असल्यास दूर करण्यासाठी विद्यार्थी व पालक सर्व दिवशी 9:30 ते 5 या दरम्यान महाविद्यालयास भेट देऊ शकतात. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणार्‍या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक राजेंद्र जाधव- 9423250477 व द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिनार्‌या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक राहुल पाटील 9096326464 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी केले आहे. सदर प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, विभाग प्रमुख , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.या उपक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी कोकरे , संचालक मंडळ, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात, सौ.सीमा जाधव, सौ. चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!