शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व महाविकास आघाडी तर्फे पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

बारामती(वार्ताहर): येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व महाविकास आघाडीतर्फे पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरचे शिबीर कसबा येथील धों.आ. सातव विद्यालयात येथे पार पाडला.यावेळी 172 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी बारामती ऍग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, शिवसेना पश्र्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेंद्र भिलारे, गटनेते सचिन सातव, शिवसेना महिला तालुका संघटक सौ.कल्पना काटकर (जाधव), उद्योजक दादासाहेब दराडे, नगरसेवक सुरज सातव, संतोष जगताप, देवेंद्र बनकर, जिल्हा समन्वयक शरद सुर्यवंशी, भिमराव भोसले, तालुका प्रमुख विश्र्वास मांढरे, संभाजी शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे व त्यांचे सर्व सहकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे बारामती ऍकॅडम येथे शिक्षण घेणार्‍या नातेपुते येथील विद्यार्थी कु.पुनम देवकर हिने रक्तदान करुन महिलासाठी वेगळा आदर्श निर्माण केला. या प्रसंगी सोमेश्र्वर शिवसेना शाखा प्रमुख संतोष गायकवाड, ऋषी जाधव, स्वनिल जाधव, सचिन झुंज, निलेश कसबे यांनी रक्तदान करणारे रक्तदाते यांना विशेष सेवा देवून जास्तीत जास्त रक्त संकलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!