इंदापूर(वार्ताहर): निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे 12 डिसेंबर रोजी ज्योती क्रांती मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी (ग्राहक सेवा केंद्र निमगाव केतकी) चे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे.
यावेळी इंदापूर शाखेचे राज दीक्षित, उमेश भारती, अविनाश रणदिवे, स्वप्नील भोसले उपस्थित होते.
ना.भरणे बोलताना म्हणाले की, मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी च्या कर्मचार्यांनी निमगाव केतकीतील ग्रामस्थांना मदत करावी आपण मदत केल्यास किती लोक विसरत नाहीत त्या आपल्याला नक्की डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच निमगाव केतकी तील सर्व ग्रामस्थ देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश मिसाळ यांनी केले व आभार वैशाली मिसाळ यांनी मानले.