फलटण: कोरोना च्या पाश्र्वभूमीवर गेली नऊ महिने झाली ग्रामीण भागात एस.टी.बस येत नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना तसेच तालुका ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणार्या मुला मुलींना तालुक्या ठिकाणी जाण्यासाठी नाहक त्रास घ्यावा लागत असल्याने आगार व्यवस्थापक साहेबांनी ग्रामीण भागात एस.टी.बस सोडण्याचा आदेश कर्मचार्यांना दिला या अनुषंगाने फलटण तालुक्यातील मलवडी हे गाव महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांचे असल्याने त्यांच्या गावी काल पासुन एस.टी.बस दहा महिन्या नंतर प्रवाशांसाठी सुरू झाल्याने आपण समाजाचं देण लागतो या हेतूने प्रकाश भैय्या गायकवाड यांनी त्यांच्या गावी एस.टी.कर्मचार्यांचा नारळ टोपी देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या वेळी मलवडी गावातील माजी उपसरपंच दिलीप कारंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य बाजीराव तरडे आणी ग्रामपंचायत मलवडी चे व्हा चेअरमन संजय टकले मलवडीचे युवा नेतृत्व पै.दिपक कारंडे व प्रकाश कारंडे तसेच दत्तात्रय तरडे कोंडीबा धायगुडे पै.दिनेश रूपनर हे मान्यवर उपस्थित होते.