अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी रक्तदान करून साहेबांवर असणारे प्रेम व्यक्त करून रक्तदान श्रेष्ठदानचा संदेश दिला आहे.
या कार्यक्रमाला आ.दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन इंदापूर तालुक्यातील सर्व सरपंचांना उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शुभम निंबाळकर, अभिजित तांबिले, प्रताप पाटील, ननवरे आप्पा, सागर मिसाळ व सर्व इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व ग्रामस्थ उपस्थित होते.