390 कि.मी.चे अंतर 65 सेदस्यांनी सायकलवर केले पार : सर्वत्र कौतुक

सुदृढ, निरोगी आणि शिवविचारांनी भारलेला युवा वर्ग निर्माण करण्याचा बारामती स्पोर्ट्स फौंडेशनचा वसा

बारामती(वार्ताहर): दि.12 डिसेंबर रोजी पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बारामती येथून उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व प्रशांत उर्फ नाना सातव यांच्या शुभहस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. बारामती-हडपसर-पुणे-मोशी-मंचर-जुन्नर-शिवनेरी ते पुन्हा बारामती हे तब्बल 390 कि.मी.चे अंतर सहभागी 65 सदस्यांनी सायकलवर पार केले .

सायकलिंगमुळे आरोग्य साधने बरोबरच सहभागी सदस्यांना व नागरिकांना संबंधित किल्याची भौगोलिक रचना, त्याचे महत्त्व, किल्ल्यावरील इतर महत्वाच्या इतिहासकालीन घडामोडी यांच्या नोंदी यांचा शास्त्रशुद्ध इतिहास नामवंत इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे व पांडुरंग बलकवडे यांच्या माध्यमातून उलगडला गेला.

कोणतेही कार्य सिद्धीस जाते ते लोकसहभाग-सहकार्य आणि चांगल्या विचारांना पाठिंबा देणार्‍या व्यक्तींमुळे !! रॅलीला प्रारंभ झाल्यानंतर 12 डिसेंबर व 13 डिसेंबर रोजीचा अल्पोपहार हे हडपसरचे प्रसिद्ध उद्योजक व आर्यन मॅन दशरथ जाधव यांनी आयोजित केला. शरद पोखरकर (मंचर) तसेच जेजुरी येथील विद्यमान नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते जयदीपशेठ दिलीपदादा बारभाई , पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी रॅलीचे स्वागत करून दुपारच्या भोजनाची व्यवस्था पहिली .

शिवजन्मभूमी जुन्नर येथे राहण्याची व भोजनाची सर्व व्यवस्था जुन्नर विधानसभेचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या मार्फत करण्यात आली. आमदार बेनके यांच्या नेटक्या नियोजनामुळे फौंडेशनच्या सदस्यांचा जुन्नर येथील मुक्काम संस्मरणीय ठरला.

रॅली मार्गावर हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी रॅली चे स्वागत केले. रॅली दरम्यान मार्गावरील बहुसंख्येने नागरिक , सायकल प्रेमी आणि पत्रकार बांधवांनी उस्फुर्तपणे उपस्थित राहून सहभागी सदस्यांचा उत्साह वाढवला आणि स्वागत केले.

13 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता गोविंद बाग बारामती येथे येथे पवार कुटुंबियांच्या वतीने रणजित पवार यांनी रॅलीचे स्वागत केले ह्यादरम्यान खा. सुप्रिया सुळे आणि मा.पवार साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फौंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला.

रॅली समारोप समारंभ शिवाजी उद्यान, कसबा येथे संपन्न झाला याप्रसंगी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त करून फौंडेशनच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन सदस्यांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी गटनेते सचिन सातव, डॉ. रमेश भोईटे , पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, संतोष नेवसे, प्रवीण झांबरे, रविंद्र थोरात आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते धाडसी सायकल राईड पूर्ण केल्याबद्दल सहभागी सदस्यांना सर्टिफिकेट आणि मेडल सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान फौंडेशन तर्फे पुढील मोहीमेची घोषणा करण्यात आली. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

सुदृढ, निरोगी आणि शिवविचारांनी भारलेला युवा वर्ग निर्माण करण्याचा वसा बारामती स्पोर्ट्स फौंडेशन इथून पुढे वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. असा विश्वास यानिमित्ताने आर्यन मॅन सतीश ननवरे व बारामती स्पोर्ट्स फौंडेशनच्या संपूर्ण टीम ने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!