अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): भारतीय संविधानाचे शिल्पकार मानवी हक्काचे कैवारी स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन बुद्धविहारामध्ये इंदापूर शहरात साजरा करण्यात आला.
भारत मुक्ती मोर्चा व इतर संघटना यांच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख आनंदराव थोरात, राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे, सुखदेव चव्हाण इ. उपस्थित होते.
नाना चव्हाण, बाबासाहेब भोंग,पप्पू पवार ,तेजस मखरे, राहुल शिंगाडे, संजय शिंदे, संजय कांबळे, सुरज धाईंजे, अमोल मारकर, संतोष कांबळे इ. मान्यवर उपस्थित होते.