बारामती(वार्ताहर): ईगल फौंडेशनच्या वतीने सिने पार्श्र्वगायक, बारामतीचे सुपूत्र भारत सदाशिव चव्हाण यांना नुकताच राष्ट्रीय गरूडझेप ऍवॉर्ड-2020 आमदार नरेंद्र दराडे यांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सिद्धार्थनगर हौसिंग सोसायटी येथील भारत चव्हाण हे सध्या कोल्हापूर याठिकाणी वास्तव्यास आहे.
यापुर्वी भारत चव्हाण यांना आर.जी.सिने एंटरटेनमेंट झंझट ऑफिशइल म्युझिक लॉन्चतर्फे कला क्षेत्रातील कलाभूषण हा पुरस्कार (सम्यक परिवार) आमदार यशवंत माने यांचे शुभहस्ते बहाल करण्यात आला होता. दै.तुफान क्रांती या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी ओबीसी फौंडेशन इंडियाचे अध्यक्ष सौ.स्वातीताई मोराळे यांच्या शुभहस्ते आदर्श सेवा सन्मान कलाभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. स्व.हरिश्र्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेतर्फे कलारत्न सन्मान-2020 पंढरपूर येथे पुरस्कार देवून सन्माननीत करण्यात आले. तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचेतर्फे राज्यस्तरीय गुणिजन गौरव कलारत्न पुरस्कार 2020 ने सन्मानीत करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार अकादमी ट्रस्टचे ऍड.कृष्णाजी जगदाळे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. भारत चव्हाण हे शिक्षक असुन त्यांच्या अंगी कला, गुणांचा भांडार आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कला, गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. कोल्हापूरसह मायभूमी बारामतीत सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.