बारामती(वार्ताहर): येथील सायली सातव हीस आत्महत्तेस प्रवृत्त करणारा पती, सासू, सासरे, दीर व सासूचा भाऊ यांचा अति.जिल्हा सत्र न्यायाधीश एस.टी.भालेराव यांनी दि.4 डिसेंबर 2020 रोजी जामीन नामंजूर केला. आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे.
सायलीचा पती अजित अरूण सातव यास अटकेच्या दुसर्या दिवशी न्यायालयीन कोठडी मंजूर झाली होती. सासरे अरूण हरिभाऊ सातव, सासू मीना अरूण सातव, दीर मनोज उर्फ सुजीत अरूण सातव व सासुचा भाऊ राजु उर्फ नंदकुमार रघुनाथ कोंडे यांचा अटकपूर्व जामीन ठेवण्यात आला होता. गुन्ह्याची पार्श्र्वभूमी पाहता सरकार पक्षाने मांडलेल्या बाजु धरून मे.कोर्टाने जामीन नामंजूर केला.
सासरच्या सततच्या जाचहाटातून स्त्री भ्रूणहत्त्या,वंशाचा दिवा, फ्लॅट, मानसिक व शारीरिक त्रास, चारित्र्यावर संशय, सायलीच्या भावाने घेतलेला फ्लॅट, दिवाळी दिवशी दिलेले 1 लाख रूपये या सर्व बाबींचा विचार केला असता सायलीला या सर्व गोष्टींना किती तोंड द्यावे लागले असेल.
सासू, सासरे, दीर व सासुचा भाऊ हे अद्याप फरार आहेत. सायलीचे चारित्र्य हनन करणारा आरोपी गौरव राम कळसकर (रा.रास्तापेठ पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास सुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही तो फरार आहे.