दररोज सकाळी 8 ते 10 भेट : सीसीटीव्ही पाहिल्यास सावकाराचा पडदा फाश होईल
बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या घरात नसतील अशा गरजेच्या सुखवस्तु पश्र्चिम कसब्यातील रोडटच सावकाराने पोलीस अधिकार्यास दिल्यावर या सावकारावर कशी कारवाई होईल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांनी सीसीटीव्ही पाहिल्यास दररोज सावकार सकाळी 8 ते 10 साहेबांना भेट देण्यास येत असतो हे उघड होईल असेही बोलले जात आहे.
मध्यंतरी सावकारांवर कारवाई झाली. हे सावकार लाखापर्यंत रक्कम व्याजाने देत होते मात्र, हा पश्र्चिम कसब्यातील सावकार कोरोडो रूपयांनी पैसे देतो आणि करोडो रूपये बाहेर फिरवलेले आहेत. याच सावकाराने छोट्या सावकारांना गुंतवले असल्याचेही बोलले जात आहे.
पोलीस अधिकार्याच्या घरात व बाथरूमध्ये दर्जेदार, नामांकित अशा सुख उपयोगी लाखो रूपयांच्या वस्तु भेट स्वरूपात दिलेल्या असल्याचेही बोलले जात आहे. सा.वतन की लकीरने वेळोवेळी अंकात या पश्र्चिम कसब्यातील सावकाराची बातमी प्रसिद्ध करूनही संबंधित पोलीस अधिकारी त्यास पाठीशी घालीत आहेत.
कर्जदारास छोट्या सावकारांची तक्रार या पोलीस अधिकार्याकडे करण्यास हा सावकार सांगतो आणि आर्थिक मलिदा घेऊन मध्यस्थी करून तेरी भी चूप मेरी भी चूप असे करीत असतो. बारामती शहरला सावकाराची तक्रार गेल्यास नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे कोणताही पक्षपात, जातपात, जवळचा, लांबचा, स्नेही न पाहता गुन्हा दाखल करतात त्यामुळे याठिकाणी तक्रार देण्यास न लावता या अधिकार्याकडे तक्रार देण्यास लावली जात असल्याचेही नागरीकांमध्ये विशेषत: बारामतीतून बदली झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी दबक्या आवाजात बोलताना दिसत होती. या पोलीस अधिकार्याच्या घरी पोलीस अधिक्षक यांच्या गुन्हे शोध पथकाने अचानक धाड टाकल्यास सुखउपयोगी वस्तु आढळून येतील व मोठा सावकार समोर येईल.