वतन की लकीर (ऑनलाईन): दि. 03 डिसेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 27 तर ग्रामीण भागातून 14 रुग्ण असे मिळून 41 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 146 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 07 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत व इतर तालुक्यात 01 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. 72 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 5 हजार 139 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 590 आहे तर मृत्यू झालेले एकशे तीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 32 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे. दुसरी लाट आली तरी तिची तीव्रता सौम्य असेल असेही तज्ञांच्या मते वर्तविले जात आहे. नव्याने आढळून येणार्या रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आहे. दिवाळीमध्ये झालेली गर्दी पाहता दुसरी लाट मोठ्या तीव्रतेची असेल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत होता. दिवाळीनंतर रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली असली तरी ही रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. नागरीकांनी जास्तीत जास्त स्वत:ची व कुटुंबातील वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे. सतत मास्क वापरा, सॅनिटायझरने हात धुवा, गर्दीत जाणे टाळा अशा छोट्या गोष्टींची काळजी घ्या.