वतन की लकीर(ऑनलाईन): 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर स्त्रीहिंसेचा विरोध करण्याचा दिवस पाळला जावा असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघात सन 1999 रोजी झालेला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी एका वैद्यकीय महिलेला लिंगपिसाट वैद्यकीय अधिकार्यापासून संरक्षण देवून या दिवसाला उजाळा दिला आहे.
एका लिंगपिसाट वैद्यकीय अधिकार्याने नियुक्त ठिकाणी कधी रूजू होणार अन्यथा मला वरिष्ठांना रिपोर्ट करावा लागेल याबाबत भिती दाखवीत पिडीत वैद्यकीय महिलेला इंदापूर रोड येथे सायं.6 च्या दरम्यान बोलावून तिच्याशी अश्लील भाषा व कृती करू लागला. जगातल्या प्रत्येक बाईने कोणत्या ना कोणत्या हिंसेचा अनुभव घेतलेला असतोच असतो, हे विधान अतिशयोक्त नाही, पण त्याबद्दल कुणीही सहजपणे बोलत नाही. मात्र या पिडीत महिलेने त्यास विरोध करून त्याठिकाणाहून पळ काढला आणि सदरचा प्रकार घरी सांगितला. कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले सदरचा सर्व प्रकार दक्ष सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांना सांगितला. शिंदे साहेबांनी संबंधित वैद्यकीय अधिकार्यास पोलीस स्टेशनला बोलाविले.
लिंगपिसाट अधिकारी थेट पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या दालनात गेला आणि मला आपण बोलाविले असे म्हणू लागला. दालनात पिडीत महिला सुद्धा उभी होती. तिने रडत वरील सर्व हकीकत सांगितली असता, पीआय शिंदे यांनी या अधिकार्यास खाकी दाखवत चांगलीच अद्दल घडविली आणि संबंधित पोलीसांना या लिंगपिसाटावर गुन्हा दाखल करा व लवकर सुटणार होणार नाही अशी तरतुद करा असे सांगताच या वैद्यकीय अधिकार्याच्या पायाखालची वाळू सरकली. सदर वैद्यकीय अधिकार्याची पत्नी, मुले यांच्या उपस्थितीत पुन्हा असे कृत्य होणार नाही असा लेखी जबाब लिहून घेतला व संबंधित वैद्यकीय महिलेची माफी मागितली. या सर्व प्रकारावरून पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी स्त्रीहिंसेचा विरोध करण्याचा दिवसाला पुन्हा एकदा उजाळा दिला. यामुळे पिडीत महिलेच्या मनात जी भिती होती ती दूर झाली व हसत घरी गेली.

पोलीस आपले हक्क व कर्तव्य बजावित असतातच, नागरीकांसाठी 24 तास पोलीस सेवा देतात. . अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा यासाठी ते काम करीत असतात. साहेबांनी या वैद्यकीय पिडीत महिलेसाठी दाखविलेली खाकीची तत्परता यामधून पुन्हा असे गुन्हे घडू नये व घडले तर नामदेव शिंदे यांच्यासारखे अधिकार्याच्या तावडीतून अन्यायग्रस्त सुटणार नाही एवढे मात्र नक्की!
काय आहे स्त्रीहिंसेचा विरोध करण्याचा दिवस….
अमेरिकेलगत असलेल्या डॉमिनिकन रिपब्लिक या चिमुकल्या देशात 25 नोव्हेंबर 1960 रोजी पॅट्रिया, मिनर्व्हा आणि मारिया तेरेसा या तीन बहिणींचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना मिराबेल भगिनी म्हणून ओळखले जाते. या तिघींची गणना त्या देशाच्या रफाएल त्रुहियो नामक लष्करी हुकमशहाच्या राजवटीला प्रश्न विचारणार्या राजकीय विरोधकांमध्ये होते. या तिघी बहिणींच्या मृत्यूनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि त्रुहियोची राजवट संपवली गेली. त्यानंतर मिराबेल भगिनींचा अपघात ही राजकीय हिंसा होती, असे उघड झाले आणि त्या तिघींना देशात हुतात्म्यांचे स्थान प्राप्त झाले. 1960 मधल्या या घटनेनंतर स्त्रियांचे समान अधिकार, स्त्रीमुक्ती या विषयांवर अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले. त्यानंतरच्या दशकात स्त्रियांप्रति केल्या जाणार्या भेदभावाचे समूळ उच्चाटन व्हावे या उद्देशाने सीडॉनामक (Convention on Elimination of all forms of Discrimination Against Women-CEDAW) सनद तयार झाली. या सनदेवर भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी स्वाक्षर्या केल्या आणि स्त्रियांप्रति भेदभाव करणारे वर्तन बदलण्यासाठी योजना राबवणे, जरूर तर कायद्यात बदल करणे, यासाठीची वचनबद्धता दर्शवली. याच क्रमात 1999 मध्ये मिराबेल भगिनींच्या मृत्यूदिनाला स्त्रियांवर होणार्या सर्व प्रकारच्या हिंसेच्या विरोधातला दिन म्हणून मान्यता दिली गेली.