विद्या प्रतिष्ठान या संस्थेवर विश्र्वस्तपदी नियुक्ती झालेबद्दल…त्यांच्या कार्याचा आढावा.
पवार कुटुंबियांच्या हितासाठी सतत झटणारे चिंतनशिल अभ्यासक, ध्येयवादी व्यक्तीमत्व किरण(दादा) गुजर आहेत. त्यांची नुकतीच विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्र्वस्तपदी एकमताने निवड करण्यात आली. ही त्यांना प्रेम, एकनिष्ठेची पावतीच मिळाली आहे.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले दादा आहेत. त्यांचा दूरदृष्टीकोन व बुद्धीमत्तेचा पुरेपूर उपयोग बारामतीकरांसाठी होत आहे. साहेब,दादा व ताईंनी दिलेले काम निष्ठापूर्वक, जीव ओतून, सर्व शक्तीनिशी, निरलसपणे करणे हा त्यांच्या यशाचा मूलमंत्र म्हटलं तर वावगे ठरू नये. कोणतेही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पद घेताना त्या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहे.
जागतिक कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी कोरोना पिडीतांना दिलेला मदतीचा हात म्हणजे त्या रूग्णांना अमृत दिल्यासारखे होईल. आजही पिडीत रूग्णांसाठी रात्री-अपरात्री पुणे, मुंबई इ. ठिकाणच्या नामवंत हॉस्पीटलशी संपर्क करून मदत करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. बारामतीत शेकडो रूग्ण वाढत असल्याचे पाहुन त्यांनी स्वत: दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले. या सेंटरमुळे रूग्णांना धीर आला आणि निसंकोच तो उपचार घेत होता व आनंदाने सेंटरमधून आशिर्वाद देत बाहेर जात होता. एकाग्र चित्तेने त्यांनी केलेल्या कार्याचे फलित झाले हे नाकारून चालणार नाही.
गेली 7 टर्म राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी किरणदादा यांना बारामती नगरपरिषदेचा कारभार पाहण्याची संधी दिली. त्या संधीचे सोनं केले. ध्येय गाठण्यासाठी त्यांनी लोकनिंदेकडे लक्ष दिले नाही. पवार कुटुंबियांच्या प्रेमाखातर त्यांनी जवळच्या लोकांबरोबर दोन हात दूर राहिले ही निष्ठा त्यांनी आजपर्यंत जपली आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जावून त्यांनी आपल्या कामाचा ठसा सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उमटविला आहे. ते आक्रस्ताळी विरोध न करता अतिशय शांत, मृदू पण तितक्याच ठामपणे आपली भूमिका पटवून देणेमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टचे संस्थापक ज्येष्ठ खासदार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी ग्रामीण गोरगरीबांना जागतिक स्तरावरील शिक्षण पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने या ट्रस्टची स्थापना सन 1999 मध्ये केली आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर क्रीडा, सांस्कृतिक आणि विस्तार क्रियाकलाप क्षेत्रातही विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाची ओळख आहे. संस्थापकांच्या दुरदृष्टीमुळे, व्यवस्थापन परिषदेची कार्यक्षमता आणि कर्मचार्यांची निष्ठा व कठोर परिश्रमामुळे उच्च शिक्षणासाठी अग्रगण्य ठिकाण होऊन बसले आहे.
या भागातील शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने, त्यांना केवळ आत्मविश्वास आणि सन्मान मिळवून देणे जे केवळ शिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला मिळू शकते, विद्यार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यास तयार करणे आणि त्यांना बनविणे. समाज आणि देशाचे जबाबदार आणि जबाबदार नागरिक बनविणे, महाविद्यालय भारतीय युवकांना त्यांच्या दृष्टीकोनातून सामाजिक-आर्थिक संवेदनशीलता वाढविताना अत्यंत स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेच्या आव्हानांसाठी तयार करण्यास तयार आहेत. अशा संस्थेवर एकनिष्ठ, तत्पर, चिंतनशिल अभ्यासक, विकासात्मक दृष्टीकोन, ध्येयवादी व पदाला न्याय देणारे जेष्ठ नगरसेवक किरण(दादा) गुजर यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
आमचे जुने स्नेही किरणजी गुजर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !