खासदार महिला, सभापती महिला, नगराध्यक्षा महिला, महिलांवरील अत्याचारात बारामतीचा नंबर का पहिला?
वंशाला दिवा, फ्लॅट, सतत चारित्र्यावर संशय, मानसिक, शारीरिक त्रास या सर्व जाचहाटातून तिची आत्महत्या की खून?
आत्महत्तेस प्रवृत्त करणार्या दोन प्रकरणात वेगवेगळा न्याय? सावकारांना 13 दिवस कोठडी, सायली प्रकरणात दुसर्याच दिवशी न्यायालयीन कोठडी?
बारामती(प्रतिनिधी): सायली सातव हिचा सासरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचहाटातून स्त्री भ्रूणहत्त्या सारख्या आणखीन एक गंभीर प्रकारास सायलीला सामोरे जावे लागले असल्याचे फिर्यादी सागर जगताप यांनी दि.25 नोव्हेंबर रोजी समक्ष उपस्थित राहुन दिलेल्या पुरवणी फिर्यादी जबाबात म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघात महिला असुरक्षित असुन महिलांना सासरच्या जाचहाटातून स्त्रीभू्रणहत्ते सारख्या कृत्याला सामोरे जावे लागत असेल ही खूप मोठी शोकांतिका आहे. कारण बारामतीमध्ये खासदार, पंचायत समिती सभापती, बारामती नगरपरिषद अध्यक्षपदी महिला असताना, जर बारामतीमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडत असतील तर ही खुप दुर्देवी गोष्ट आहे. सासरचे लोक जरी अन्याय, अत्याचार खोटा आहे म्हणत असतील मात्र, स्त्रीभ्रूण हत्त्या मात्र खरी असणारच असेही बोलले जात आहे.
बारामतीत स्त्रीभ्रूण हत्त्या, महिलांना संरक्षण, महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी युवती कॉंग्रेसची स्थापना व ङ्ककौटुंबिक हिंसाचार ही मर्दानगी नाहीङ्ख अशा म्हणणार्या व महिला व युवतींमध्ये जनजागृती करणार्या खा.सुळेंचे कार्य फक्त कागदावरच आहे का? अशीही चर्चा बारामतीत सुरू आहे.
सातव कुटुंब सुशिक्षित व समाजात या कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकांमध्ये या कुटुंबाचा नावलौकीक आहे. अशा कुटुंबियांकडून कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभू्रण हत्त्या सारखे गंभीर कृत्य होत असल्याची फिर्याद आरोप होत असेल तर बारामतीत प्रत्येक चौकात चर्चेचा विषय होवून बसला आहे.
बारामती शहरात आत्महत्तेस प्रवृत्त करणार्या दोन गंभीर घटना घडल्या. यातील पहिली घटना सावकाराच्या जाचातून प्रतिष्ठीत व्यापार्याची आत्महत्या व दुसरी सायलीची आत्महत्या. या दोन्ही घटनांमध्ये पिडीत व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. पहिल्या घटनेतील आरोपींना तब्बल 13 दिवस पोलीस कोठडी मिळाली. तर दुसर्या घटनेत 5 आरोपींपैकी फक्त सायलीच्या पतीला अटक करून दुसर्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळाली व इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन मांडलेला आहे. पहिल्या घटनेत सुसाइड नोट नुसार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दुसर्या प्रकरणात सायलीकडे एक मोबाईल सापडला त्यात अश्लील छायाचित्र व चॅटींग होते ते माहेरी कळेल म्हणून तिने आत्महत्त्या केल्याचा संशय अटकेपूर्वी पतीने व्यक्त केला असल्याचे पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पहिल्या प्रकरणात सुद्धा काही सावकारांचे आत्महत्त्या करणार्या पिडीताबरोबर मैत्रिचे संबंध होते त्याने सुद्धा कित्येक वेळा गरजेच्या वेळी पैश्याची मागणी केलेले चॅटींग, मेसेज, कॉल रेकॉर्ड असतील, तरी सुद्धा 13 दिवस पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलीसांनी केलेली मेहनत कामी आली.
सायलीचा पती म्हणतो सासरच्या छळामुळे नव्हे, तर ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केली. जर असे असेल तर, सन 2013 पासुन वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलासाठी तिचा जाचहाट का केला? पुण्याच्या लगत 2 बीएचके फ्लॅटची मागणी का केली. फ्लॅट बुक केल्यावर त्रास देण्यास काही प्रमाणात कमी का केले. फ्लॅट नावावर कधी करणार म्हणून सायलीला सतत मारहाण केली यामध्ये सायलीच्या चेहर्यावर दुखापत झाली या दुखापतीचा औषधउपचार एका डॉक्टरांकडे का केला. ऑक्टोबर 2020 मध्ये मारहाण करून घरी का सोडले. सायलीबरोबर दसर्यादिवशी सुद्धा पतीने सायलीच्या आईसमोर फ्लॅटसाठी भांडणे का केली. पतीने दिवाळीचे खरेदी करीता पैशाची मागणी केली आरोपीने त्रास देवू नये म्हणून फिर्यादी भावाने दिवाळी सणासाठी 1 लाख रूपये रोख दिले. त्यानंतर पती सायली व तिचे दोन मुलांना घेऊन बारामतीत गेला असेही पुरवणी जबाबात म्हटले आहे.
पहिल्या वेळेस गरोदर असताना बाळाची वाढ होत नसल्याने तिचा गर्भपात केला मात्र, नंतरच्या वेळेत चैतन्य हॉस्पीटल (डॉ.जळक) यांचेकडे गर्भ लिंग निदान केले व त्यावेळी स्त्री जातीचे अभ्रक असल्यामुळे गर्भपात करण्याचा निर्णय घेतला त्यास सायलीने विरोध केला तर तिस सासु व नवर्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला व नाईलाजास्तव गर्भपात करावा लागला असेही फिर्यादी यांनी पुरवणी जवाबात म्हटले आहे.
सन 2014 मध्ये पुन्हा सायली गरोदर राहिली असता पुन्हा पाढे तेच त्याप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींनी जाचहाट सुरू केला. सायलीने गर्भपात करण्यास विरोध केल्यावर तिचा अमानुषपणे मानसिक व शारीरिक छळ केला. 4 ते 5 महिन्यांनी तिने गर्भपात करण्याकरीता होत असलेला त्रास असह्य असल्याचे तिने माहेरकडच्या आई, भाऊ इ. लोकांना सांगितले होते. यासर्व प्रकाराची फिर्यादीने सायलीच्या कुटुंबात विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीची उत्तरे दिली. लग्नात तुम्ही आमच्या मोठेपणाला शोभेल असा कोणताही मानपान लग्नात दिला नाही. त्यामुळे लोकं नावे ठेवायला लागली, आमचा अपमान झालेला आहे असे सायली फिर्यादी भावाला भेटायला गेल्यास रडून सांगत असे.
फिर्यादी सतत बहिणीला चांगले नांदवावे म्हणून सतत हातजोडून विनंती करीत असे. तरी सुद्धा पती, सासु, सासरे, दीर व सासुचा भाऊ सतत मारहाण, मानसिक, शारीरिक छळ सुरूच ठेवला होता.
- सॅमसंग मोबाईल कोणाचे नावे आहे, त्यातील छायाचित्र सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इडिट केलेले आहे किंवा कसे? छायाचित्र लग्नापुर्वी व लग्नानंतरचे आहे याबाबत तपासणी करणे गरजेचे आहे.
- आरोपींनी स्वत:ची या प्रकरणातून सुटका व्हावी म्हणून मोबाईल, छायाचित्र,चॅटिंगचा प्रकार केला आहे का? अशीही चर्चा सुरू आहे.
- लग्न झालेपासुन वंशाचा दिवा, फ्लॅट इ. मानसिक व शारीरिक त्रास होता मग, अचानक ब्लॅकमेलिंग, अश्लील छायाचित्र आले कोठून याबाबत सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. पहिल्यापासून चारित्र्यावर संशय होता तर मग पुन्हा माहेरहून सायलीला कशाला घेऊन आला?
- सायलीचे चारित्र्य हनन करणारा आरोपी गौरव राम कळसकर (रा.रास्तापेठ पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप तो फरार आहे तो ताब्यात आल्यावर कोण खरे,कोण खोटे याबाबत सर्व पितळ उघडे पडणार आहे.