बारामती(वार्ताहर): बारामती तालुका पोलीस स्टेशनने धडाकेबाज कामगिरी करीत विविध गुन्ह्यात हवा असलेला सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून 8 दुचाकी वाहने जप्त केली. ज्ञानेश्र्वर बापू चव्हाण (रा.शेरेशिंदेवाडी, ता.फलटण) असे आरोपीचे नाव आहे.
तालुक्यात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. नव्याने नियुक्त झालेले दक्ष पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शोध पथकाला जबाबदारी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे व पथकाने गोपनीय माहिती काढून आरोपीस ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता बारामती तालुका व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपीकडून पल्सर, युनिकॉर्न, अपाईची, स्प्लेंडर अशा 8 दुचाकी वाहने अंदाजे 5 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तालुका पोलीस स्टेशनला कलम 379 नुसार गु.र.नं. 605/2020, 678/2020, 389/2017 नुसार गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर आरोपीवर सातारा, वाई, मेढा, हडपसर, फलटण ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या ताब्यात असणार्या दुचाकी वाहनांचा तपशिल स्प्लेंडर (MBLHA10EE99G03142), अपाची (0E4CA2266222) सिटी 100(DUFBLJ34002), पल्सर- 220 (MD2A13EYXJCF00567), पल्सर- 150 (MD2A12DZXDCM83629) असा आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.ह.जयंत ताकवणे, दत्तात्रय सोननीस, कॉन्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे, संतोष मखरे, प्रशांत राऊत यांनी केलेली आहे.