बारामती(वार्ताहर): स्वच्छ सर्वेक्षण-2021 आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रेक्टिट बेनकाइजर या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सीएसआर फंडाद्वारे संचलित जागरण पहल संस्था नवी दिल्ली आणि जागतिक शौचालय महाविद्यालय औरंगाबाद यांचेमार्फत स्वच्छता कर्मचार्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कै.वसंतराव पवार नाट्यगृहात यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी मुख्य प्रशिक्षण राम पानसकर आणि सहाय्यक प्रशिक्षक कपिल शिवसरण यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाकरीता मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक शौचालय महाविद्यालय संस्थेचे राशीद अन्सारी आणि आरोग्य विभाग प्रमुख सुभाष नारखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.