बारामती(वार्ताहर): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी एप्रिल-2019 मध्ये घेतलेल्या बी.एस्सी. परीक्षेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी मुकुंदा शिवाजी ढाले याने संख्याशास्त्र विषयामध्ये 1200 पैकी 1144 गुण मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. अभ्यासातील सातत्य, शिक्षकांशी विविध घटकांवर चर्चा व महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मुकुंदा ढाले याने हे अभिमानास्पद यश प्राप्त केले.
श्री.ढाले याच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव जवाहर शाह (वाघोलीकर), सर्व संस्थाचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश जगताप व विभागातील प्राध्यापक, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी श्री.ढाले याचे अभिनंदन केले आहे.