बारामती(वार्ताहर): दि. 29 ऑक्टोबर रोजी दिवसभरात तालुक्यातील प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटी-पीसीआर-21 त्यापैकी पॉझिटिव्ह -09 आले असुन एन्टीजन 32 तपासणी करण्यात आली त्यापैकी एकूण 03 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काल दिवसभरात 12 रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दि.28 नोव्हेंबर रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 23 जणांचा आरटी-पीसीआर तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 02 व तालुक्यातील 02 असे एकूण 04 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. काल शासकीय आरटी-पीसीआर बंद असल्याने चाचण्या घेण्यात आल्या नसल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले आहे.
बारामतीत 4 हजार 953 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 462 आहे तर मृत्यू झालेले एकशे अठ्ठावीस आहेत.
किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतूक कर्मचारी इत्यादी ज्यांचा लोकांशी वारंवार संपर्क येतो, अशा वर्गातील लोकांच्या चाचण्या प्राधान्याने करण्यात याव्यात.
हे लक्षात ठेवा व पालन करा–
गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात असताना मुखपट्टीचा योग्य वापर करा. हातांची व नेहमी स्पर्श होणार्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता ठेवा. सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करा. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणे टाळा. अनावश्यक प्रवास टाळा. वारंवार हात स्वच्छ करा. समाजमाध्यमाचा गैरवापर म्हणजेच चुकीचे संदेश/ अफवा पसरवणे टाळा. मानसिक ताण तणाव असल्यास नातेवाईक-मित्रांशी संवाद साधा आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.