राजामाता बहुउद्देशीय सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत रक्तदान हेच जीवन दान ग्रुप च्या माध्यमातून लातुर जिल्हात व सोलापूर, हैद्राबाद, औरंगाबाद, पुणे, मंबई, दिल्ली व महाराष्ट्र राज्यात या ग्रुप च्या माध्यमातून रूग्णांना रक्त, पांढर्या पेशी, प्लाझ्मा तात्काळ पुरवण्याचे काम ही संस्था करत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 हजार रूग्णांना रक्त पुरवठा केला. यापुढे रक्त, प्लाझ्मा व पेशी इ. पुरवठा करण्यास संस्था कार्यरत राहणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून जीवाची परवाना न करता कोरोना काळात काम करणार्या व्यक्तींचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून त्यांचा गुणगौरव करीत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी(भैय्या)जाधव, उपाध्यक्ष राम शिंदे, सचिव विवेश शिंदे, कोषाध्यक्ष विशाल देवकाते, सहसचिव श्रीकांत फोलाने व पुणे महिलाध्यक्षा सौ.कल्पना काटकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कोरोना योध्दा सन्मान पञ 10 जनाना ऑनलाईन देण्यात आले.
यामध्ये शिवसेना बारामती तालुका संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) जयेश ओसवाल(दौंड), हर्षल भटेवरा(राहु, दौंड), मंगेश सुरवसे(पिंपरी), सुरज चोरघे (यवत,दौंड), मयुर सोळसकर(कासुर्डी), धनराज मासाळ (केडगाव, दौंड), विरेश छाजेड (पिंपरी), संजय गांधी (नातेपुते), सचिन बोगावत (भिगवण), संतोषभाऊ गोपाळ रक्त मित्र पुणे जिल्हा, आजित भटेवरा (धनकवडी), विवेक महाजन (जळगाव), , बारामती यांना सन्मानित करण्यात आले आहे.