बारामती (वार्ताहर): बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल संघटकपदी तनवीर फैय्याज इनामदार यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन शेंडे यांनी शहराध्यक्ष इम्तियाज शिकलकर, ओबीसी सेल शहराध्यक्ष स्वप्निल भागवत, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष दिपक बर्गे, शब्बीर शेख, सुधाकर माने आदींच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.