बारामती(वार्ताहर): अरणंगाव(ता.जामखेड) येथील रहिवासी प्रा.शिक्षक देविदास दादा पारे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कणखर नेतृत्व व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, अ.जि.प्राथमिक शिक्षक बँकेचे ते माजी चेअरमन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली होती. पुणे जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षकांना ते आपले नेते म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात चार मुले,सूना,नातवंडे आहेत. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे वि.उपाध्यक्ष तथा भावे हायस्कूलचे कला शिक्षक विनोद पारे यांचे ते वडील होत.