बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल बारामती शहर अध्यक्षपदी स्वप्नील श्रीधर भागवत यांची ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन शेंडे यांनी नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नाळे, राष्ट्रवादी जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल जाधव, शहर सेवादल अध्यक्ष श्रीकांत जाधव, अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष किरण इंगळे, प्रकाश पळसे, अमर लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते मोहन भटीयानी, निलेश गायकवाड, तेजस गायकवाड इ.मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नील भागवत हे अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष, बारामती मर्चंट असोसिएशनचे मा.सदस्य व बारामती तेली पंच मारुती मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत. या तिन्ही संस्थांवर त्यांनी तन-मन व धन लावून आदर्श घ्यावा असे काम केले आहे. या सामाजिक कामाची दखल घेत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कामात सक्रीय सहभाग या सर्व बाबींचा विचार करून त्यांची ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे नेते पवार साहेब, दादा व ताईंचे उच्च विचार तळागाळात पोहचविण्यासाठी तन-मन लावून प्रयत्न करणार आहे. प्रत्येक घटकाला पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असुन, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.भागवत यांनी बोलताना सांगितले.