सावकारांनी अवैध मार्गाने कमविलेली संपत्ती शासन जमा करण्याची मागणी : फ्लॅट, मोकळे प्लॉट, दागिणे, वाहनांचा समावेश
हाताची घडी तोंडावर बोट संचालक मंडळाची भूमिका? : पोलीसांनी सुसाइड नोट जाहीर करावी
बारामती(वार्ताहर): येथील सावकाराच्या जातून प्रतिष्ठीत व्यापार्याचा बळी या प्रकरणात पोलीसांनी येरवडा कारागृहाची हवा दाखविली. बारामती सहकारी बँकेतील कॅशइर सावकार हनुमंत गवळी व शेतकर्यांसाठी उभारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सावकारकीचा अड्डा केलेला संजय काटे या दोघांना पाठीशी घालणार्या या दोन्ही संस्थांची चौकशी होऊन कारवाई होणार का? अशी बँकेचे सभासद व व्यापारी, शेतकर्यांमध्ये बोलले जात आहे.
विशेषत: प्रतिष्ठेचा बुरखा पांघणार्या पश्र्चिम कसब्यातील रोडटच सावकाराचा यामध्ये समावेश असताना त्यास कोण पाठीशी घालीत आहे या सावकाराची सखोल चौकशी केल्यास नक्कीच मोठी प्रकरणे बाहेर येतील. हा सावकार कोट्यावधी रूपये व्याजाने देतो. मध्यंतरी या सावकाराने धान्याच्या वाहनात 20 लाख रूपयांची मांडवली सुद्धा केली होती. या सावकाराची बातमी प्रसिद्ध केली असता हा सावकार त्याच्या एका मित्राजवळ म्हणाला ङ्कनाव टाकून बातमी टाक म्हणावेङ्ख मग बघतो असे म्हणाला. मी नाही त्यातली कडी लाव आतली अशी अवस्था या सावकाराची आहे.
बारामती बँकेतील गवळी गेल्या कित्येक वर्षापासुन एकाच ठिकाणी व एकाच पदावर ठाम मांडून बसलेला आहे. आजपर्यंत कधीच बदली करण्यात आली नाही. भरणा भरताना व घेताना कित्येक संस्था, व्यापारी व व्यक्तिगत लोकांना पैसे कमी आल्याच्या लेखी व तोंडी तक्रारी शाखाधिकारी यांच्याकडे आल्या असताना सुद्धा सदर सावकाराची बदली का केली नाही हा खरा प्रश्र्न आहे. शाखाधिकारी यांनी या गवळी सावकारास का पाठीशी घातले? यामुळे शाखाधिकारी व इतर अधिकार्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या गवळी सावकाराच्या कार्यकाळात बँकेचा सार्वजनिक पैश्याचा अपहार तर झाला नाही ना? याबात हिशोब पत्रकांची चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेच्या काही कर्मचारी व अधिकार्यांना सुद्धा या बहाद्दारे व्याजाने पैसे दिले असल्याचे कळते. संचालक मंडळाने या आलेल्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. का? संचालक मंडळासमोर आलेल्या तक्रारी ठेवल्याच नाहीत असाचा प्रश्र्न आहे.
त्याचप्रमाणे, शेतकर्यांच्या हितासाठी उभारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सावकारकीचा अड्डा संजय काटे याने केला होता. काटे सकाळी लवकर येऊन येथील टेलीफोन, कर्मचार्यांकडून सेवा इ. यंत्रणेचा पुरेपूर वापर करून व्याजाने पैसे देण्याचे एक प्रकारे दुकानच उघडले असल्यासारखे होते. व्याज देणार्या व कर्ज घेणार्यांना याठिकाणी बोलावून बाजार समितीचाच चहा पाजुन त्यांना पाठवीत होता. हा सर्व दैनंदिन कारभार समितीचे सभापती, संचालक मंडळ व सचिव उघड्या डोळ्याने पहात असताना सुद्धा कोणीही हटकले नाही त्यामुळे बाजार समितीला या सावकाराचा काही हिस्सा होता का? अशीही बाजार समितीत चर्चा सुरू आहे. या समितीतील टेलीफोनची इनकमिंग व आऊट गोविंगची माहिती घेतल्यास आणखी सत्य बाहेर येईल.
सावकारांनी अवैध मार्गाने कमविलेली संपत्ती शासन जमा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सावकारांनी थेट खरेदीखत, साठेखत, फ्लॅट, मोकळे प्लॉट, दागिणे व वाहनांचा समावेश आहे.
ज्या सुसाइड नोट नुसार पोलीसांनी संबंधित 9 सावकारांवर कारवाई केली. ती नोट जाहीर केल्यास यामधील आणखीन सावकारांचे गुन्हे समोर येतील. नक्की किती सावकार किती, कोण सावकार हे न कळाल्याने कित्येक पिडीतांना तक्रार देण्यास अडचण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
हनुमंत गवळी यास निलंबित केले आहे. त्याच्या कार्यकाळात कामाची अनियमितता दिसून येत नाही. संचालक मंडळास खातेदार, ठेवीदार व व्यापार्यांनी भेटून बदली न करणेबाबत विनंती केली होती त्यामुळे त्याची बदली केली नाही. चार महिने अंतर्गत बदली करण्यात आली होती तो अधिकार संबंधित शाखाधिकारी यांना आहे. – रविंद्र बनकर, व्यवस्थापक, बारामती सहकारी बँक
कोणत्याही वैध/अवैध सावकाराने विक्री,गहाण, लिज, अदलाबदल किंवा कोणत्याही मार्गाने एखाद्या कर्जदाराची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली असेल व अशा कर्जदाराने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 च्या कलम 16 व 17 नुसार जिल्हा निबंधकाकडे अर्ज केल्यास त्या कर्जदारास ती मालमत्ता परत मिळविता येते. सदरचा व्यवहार अर्जाच्या तारखेपासून पाच वर्षाचे आतील असावा