बारामती(वार्ताहर): सासरच्या लोकांनी आत्महत्तेस प्रवृत्त केल्याने सायली अजित सातव हिने गळफास घेऊन आत्महत्या केली की तिचा खून झाला याबाबत बारामतीत प्रत्येक चौका-चौकात चर्चेला उधान आले आहे.
याबाबत 5 आरोपींपैकी सायलीचा पती अजित अरूण सातव यास अटक केली असुन इतर 4 फरारी आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार व सायलीचा भाऊ सागर सुनिल जगताप(वय-31 वर्षे, रा.उरूळी देवाची, ता.हवेली, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.21 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वा.20 मि. सायली (वय-30 वर्षे) हिने सातववस्ती (ता.बारामती) येथील सासरी राहते घरातील बेडरूममध्ये आरोपी पती अजित अरूण सातव, सासू मिना अरूण सातव, सासरे अरूण सातव (पूर्ण नाव माहित नाही), दीर मनोज अरूण सातव (सर्व रा.सातववस्ती, बारामती) व मामा राजु कोंडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी सायलीला लग्नात भांडी व संसार उपयोगी सामान त्यांच्या मागणी प्रमाणे न दिल्याच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याच्या कारणावरून तीस वेळोवेळी सामुहिक मानसिक शारीरिक त्रास देवून तिचा जाचहाट छळ केल्याने या त्रासाला कंटाळून सायलीने जीवन जगणे असह्य झाल्याने तिने राहते घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरील सासरचे लोकांनी तीस आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आरोपींवर बारामती शहर भाग 5 गुन्हा रजि.नं.571/2020 भा.द.वि.क.498(अ), 306,323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील सर्व आरोपी सायलीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होती तर संबंधित तिचे चारित्र्य हनन करणार्यास धडा का शिकविण्यात आला नाही असेही नागरीकांमध्ये बोलले जात होते. सायली माहेरी दिवाळीसाठी गेली होती. जर तिच्या चारित्र्यावर संशय घेत असणार्यांनी तीस पुन्हा बारामतीत घेऊन कसे आले याबाबतही चर्चेचा विषय बनला आहे. सर्वसामान्य कुटुंबात चारित्र्यावर संशय उपस्थित केल्यास त्या महिलेस तिच्या माहेरी आई-वडिलांच्या ताब्यात दिले जाते. मात्र, याठिकाणी असे झाले नाही. सातव कुटुंब सुशिक्षित व समाजात या कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकांमध्ये या कुटुंबाचा नावलौकीक आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघात महिला असुरक्षित आहेत. अशा सुशिक्षित व राजकीय सामाजिक वलय असणार्या कुटुंबियात असे होत असेल तर तळागाळातील महिलांचे काय? असाही प्रश्र्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. महिलांवर होणार्या अत्याचार रोखण्यासाठी सुप्रिया सुळेंनी युवती कॉंग्रेसची उभारणी केलेली असताना बारामतीत मात्र महिला असुरक्षित असल्याचे दिसत आहे.
माजी केंद्रीय कृषि मंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांनी महिला धोरण आखले, राजकारणात पन्नास टक्के आरक्षण, संरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे.
पोलीसांनी कलम 306 मधील सावकारांना पळू न देता अटक केली. मात्र सायलीला जाचहाट व आत्महत्तेस प्रवृत्त करणार्या 5 आरोपींपैकी फक्त तिचा पती अजित सातव यास अटक केली व इतर फरार दाखविण्यात आले आहे याबाबतही सर्वत्र तर्कविर्तक चर्चेला उधान आले आहे. जर आरोपींचा सायलीच्या चारित्र्यावर संशय होता तर तिचे चारित्र्य हनन करणार्यास आजपर्यंत अटक का करण्यात आली नाही अशीही चर्चा सुरू आहे.